ABOUT US
About Us
सन्माननीय सभासद बंधू व भगिनींनो
आपलया संस्थेची स्थापना दि. १४/०८/१९८० रोजी संस्थेच्या त्यावेळेच्या इंजिनिअर्स सभासद यांच्या अथक प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील मरा��िमंडळाची पहिली इंजिनिअर्स पतसंस्था सातारामध्ये स्थापन झाली. त्यावेळी फक्त काही जेमतेम सभासद संख्या असलेली पतसंस्था आज भरभराटीला आली आहे
ज्यावेळी संस्था स्थापन झाली त्यावेळी कर्जमर्यादा फक्त १० हजार होती ती आज रोजी सभासदांची कर्जाची गरज लक्षात घेता कर्ज मर्यादा हि २१ लाख (दीर्घ मुदत कर्ज मर्यादा रु. २० लाख व मध्यम कर्ज मर्यादा १ लाख एवढी आहे) करण्यात आली असून ती सभासदांची कर्ज मागणी हि संस्था स्वभांडवलावर पूर्ण करीत आहे.
संस्था स्थापनेवेळी शेअर्सची किंमत फक्त २० रुपये होती. त्यात आजपर्यंत वाढ करण्यात येऊन आज शेअर्सची किंमत हि ५०० रुपये एवढी करण्यात आली आहे. संस्थेचे भागभांडवल वाढविण्यासाठी शेअर्सची किंमत वाढविणे व शेअर्सची संख्या वाढविणे हे गरजेचे असलेणे हि वाढ करण्यात आली आहे.
उत्तरोत्तर संस्थेची प्रगती होऊन संस्थेचे संचालक व असणारे सभासद यांच्या प्रयत्नामुळे सभासद संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आजअखेर म्हणजे सन २०२२-२०२३ अखेर सभासद संख्या ५३५ एवढी आहे.
संस्था स्थापनेवेळी सभासद कर्ज व्याजदर २० % होता. सभासदांच्या गरज लक्षात घेता कर्ज रकमेमध्ये वाढ करण्यात आली असून सभासदांचा कर्ज व्याजाचा बोजा कमी करण्यासाठी कर्ज व्याजदर हि कमीतकमी करून सभासदांच्या कर्ज गरजा पूर्ण केल्या जातात. आता कर्ज व्याजदर हा ९.५० % एवढा आहे.
सुरुवातीच्या दशकामध्ये लाभांशाचा तसेच कायम व सभासद ठेवीवरील व्याजदर अल्प होता त्यात वाढ करून त्याचा दर ९.५० व १० % करण्यात आला आहे.
संस्था स्थापनेपासून ते आजपर्यंत संस्थेचा कारभार हा सहकारी संस्था नियम व कायद्याचे काटेकोरपणे पालन करून केला जात आहे. त्यामुळे संस्थेस सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ ‘ मिळाला आहे. संस्थेची ४३ वर्षांपर्यंत प्रगती चालू आहे.
संस्थेची प्रगती संस्थेचे संचालक मंडळ, संघटना व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच झाली आहे. आज संस्था स्वताच्या पायावर भक्कमपणे उभी आहे.
संस्था करीत असलेले उपक्रम –
- १) सभासदांकडून ठेवी स्वीकारणे.
- २) दरमहा भाग वर्गणी जमा करून कर्ज वाटपासाठी भांडवल उभारणी करणे .
- ३) सभासदांच्या गुणवंत पाल्याचा सत्कार व बक्षीस समारंभ
- ४) सभासदांसाठी अपघाती विमा रुपये १.५० लाख व मयत सभासदांच्या वारसांना रुपये ७.५० लाखाची मदत.
- ५) सभासदांना दरवर्षी डायरी भेट दिली जाते.
- ६) नैसर्गिक आपत्ती झाल्यास सामाजिक मदत .
- ७) स्वनिधीतून स्वताच्या मालकीचे भव्य इमारत .